स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने बाल दिनानिमित्त निबंध स्पर्धा- २०२५.
प्रतिनिधी- सारंग महाजन
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने बालदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे.
निबंध स्पर्धा विषय –
प्राथमिक गट- वर्ग ३ री ते ६ वी :
बालदिनाचे महत्त्व”, “मुले: उद्याचे भारत, तर
माध्यमिक गट – वर्ग ७ वी ते १० वी : “चाचा नेहरू आणि त्यांचे मुलांवरील प्रेम” किंवा “मुलांचे हक्क आणि शिक्षण”
असे विषय आहेत. निबंध शब्द मर्यादा जास्तीत जास्त ५०० शब्दांपर्यंत असावी. निबंध स्वतः लिहिलेला असावा. इतरत्र प्रकाशित झालेला मजकूर निबंधात आढळल्यास निबंध ग्राह्य धरला जाणार नाही. निबंधाच्या मागील बाजूस पूर्ण नाव, पत्ता, वर्ग, शाळेचे नाव तसेच मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा. निबंध स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिके काढण्यात येतील. मान्यवरांच्या हस्ते १४ नोव्हेंबर नंतर पारितोषिकाचे वितरण होईल. निबंध १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पियुष फोटो स्टुडिओ १०६३, शिवाजी चौक, भिंगार, अहिल्यानगर – ४१४ ००२ या पत्त्यावर स्वतः किंवा पोस्टाने / कुरिअर ने पाठवायचे आहेत. अधिक माहिती साठी ८७९३ १९१९१९ या क्रमांकावर संपर्क साधावा. मागील विजेते स्पर्धकांना सहभाग घेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी निबंधावर आपल्या वर्गशिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे.








