अकोल्याची कन्या कु: पूजा सरकटे मरोडा पोलीस सेवेत, कर्तव्याला नवी सुरुवात!
(अकोला जिल्हा) प्रतिनिधी. निळकंठ वसु पाटील
पोलीस खाकी ही केवळ एक वर्दीं नसून ती शिस्त, पराक्रम, आणि जनसवेचे प्रतीक मानले जाते. खाकी रंगाचा हा गणवेश अंगावर चढवणे आणि समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर असणे,हे लाखों तरुणाचे स्वप्न असतं… अकोला जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील आणि लहानपणापासून खाकी वर्दीची आवड असणाऱ्या अकोल्याची कन्या कुमारी पूजा ताईं सरकटे मरोडा यांची नागपूर पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नव्या एन्ट्रीमुळे आता पोलीस सेवेला नवी सुरुवात झाली आहे. मरोडा कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी पूजा ताई म्हणाल्या मी पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार असेही त्यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली आहे. आदरणीय पूजा ताईला पुढील सेवेसाठी तुम्हां सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.*








