एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यांत 13 बालविवाह रोखण्यात यश:- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यांत 13 बालविवाह रोखण्यात यश:- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

रणजित मस्के  मुंबई प्रतिनिधी

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रभावी उपाय योजनेमुळे राज्यांत जवळपास 13 बालविवाह रोखण्यात विभागाला यश महिला बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी माहिती दिली आहे. यामध्ये रायगड-१ अहिल्यानगर-५ बुलढाणा-१ यवतमाळ-२ छत्रपती संभाजीनगर-१ धाराशिव-२ परभणी-१ असे एकूण 13 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असल्यास अशा विवाहांना आळा घालण्यासाठी मंगल कार्यालय मालक वाजंत्री पथक पुजारी तसेच संबंधित नातेवाईकांवर 24 तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली आहे. राज्यांच्या महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हास्तरीय बैठक वीसी द्वारे संपन्न झाली. सदर बैठकीस राज्यांचे महिला व बालविकास आयुक्त सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा बाल व बालविकास अधिकारी उपस्थित होते… या बैठकीत ग्राम स्तरांपासून ते जिल्हास्तरांपर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये राज्यांतील सर्व सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या बाल विवाहापूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नागरिकांना बालविवाह संदर्भातील कोणतीही माहिती असल्यास त्यांनी हेल्पलाइन 1098 किवा डायल 112 घ्यावी व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यांत बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला समाजांतील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवर्जून राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link