एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सांगलीच्या पोलिस अधीक्षक पदी आता तुषार दोशी; जिल्ह्यात अंमली पदार्थ,नशेखोरी वितरण साखळी नष्ट करणार

सांगलीच्या पोलिस अधीक्षक पदी आता तुषार दोशी; जिल्ह्यात अंमली पदार्थ,नशेखोरी वितरण साखळी नष्ट करणार

सांगली जिल्हा  अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

सांगली जिल्ह्यात आता नव्याने पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती झाली आहे. सांगलीचे सध्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता झाल्यामुळे घुगे यांची मागील काही दिवसांपासून पोलीस वर्तुळात बदलीबाबत चर्चा होती. सांगली पोलीस अधीक्षक पदासाठी अनेक नावाची चर्चा होती. मात्र अखेर तुषार दोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तुषार दोशी हे देखील सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या घडामोडींमुळे बदलीच्या चर्चेत होते. तर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे मुंबईला बदली झाली आहे. सांगली जिल्ह्यात काही महिन्यांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता. त्यात वाढती गुन्हेगारी नशेखोरी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीला कसा लगाम घालणार हा प्रश्न देखील आता आहे. नशेखोरी वाढती गुन्हेगारी अंमली पदार्थाची निर्मिंती साठा आणि वितरणाची साखळी नष्ट करण्याची आव्हान आता नव्या पोलीस अधीक्षकांसमोर असणार आहे. सांगली जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी तुषार दोशी पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहेत. साताऱ्यातील बदलीनंतर शेजारच्या जिल्ह्यातील बदली ही त्यांची बक्षीस बदली म्हणण्यात काय वावगे ठरणार नाही. त्यांच्या इंट्रीमुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढणार असे स्पष्ट दिसून येत आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link