मराठवाड्यातील सर्व रेल्वे स्टेशनसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकास करण्याची मागणी डॉ. शिवाजी शिंदे यांनी केली.
जिल्हा प्रतिनिधी परभणी अनिल चव्हाण
सेलू : दि.27 सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील रहिवाशी असलेले डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची गेल्या वर्षी झेड आर यु सी सी रेल्वे बोर्ड सदस्य पदी निवड झाल्यानंतर पहिली बैठक 25 जून 2025 रोजी प्रयागराज येथे येथे झाली होती त्यावेळी मनमाड ते परभणी पर्यंत रेल्वे दुहेरीकरणासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यावर त्वरित कारवाई करून 2500 कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. सेलू रेल्वे स्टेशनवर काही गाड्यांना थांबा मिळत नव्हता म्हणून मागणी केली होती त्यापैकी अजिंठा एक्सप्रेस ला सेलू रेल्वे स्टेशन वर मिळाला आहे दिनांक 20 मे 2026 रोजी दुसरी बैठकप्रयागराज येथील पंचतारांकित हॉटेल कान्हा शाम येथे रेल्वे बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी, मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये डॉ. शिवाजी शिंदे यांनी मराठवाड्याच्या सर्व रेल्वे स्टेशनचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन सर्व रेल्वे टेशन चा विकास करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. परभणी, मानवत, सेलू, परतूर,जालना, छत्रपती संभाजीनगर आदी रेल्वे स्टेशनचे विकास कामे अतिशय संथ आणि मंद गतीने सुरू असल्यामुळे सर्व यात्रेकरूंना नाहक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन सर्व रेल्वे स्टेशनचा लवकरात लवकर विकास करण्याची मागणी केली. प्रामुख्याने सेलू रेल्वे स्टेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पंतप्रधान अमृत योजने अंतर्गत रेल्वे विकास कामाचे कार्य अतिशय धिम्या गतीने चालू आहे. पूर्ण उन्हाळा यात्रेकरूंना बसण्यासाठी सुविधा नसल्याने उन्हात बसावे लागत आहे. स्टेशन मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने यात्रेकरूंना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशन वर टॉयलेटची व्यवस्था नसल्यामुळे अनेक यात्रेकरूंना याचा त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय लवकरच पावसाळा येत असल्याचे निदर्शनास आणून यात्रेकरूंची होणारी समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. सेलू रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर धनेगाव जवळील शेतकऱ्यांसाठी जाण्या येण्या साठी अंडरग्राउंड पुलाची मागणी जोर धरत असून संबंधित शेतकऱ्यांनी लेखी निवेदन रेल्वे प्रशासनास दिलेले असून त्यावर कुठलीच कारवाई केल्याचे दिसून येत नाही.शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सेलू रेल्वे स्टेशनवर काकीनाडा – साईनगर शिर्डी, विजयवाडा – साईनगर शिर्डी, विशाखापट्टणम – नगरसोल आदी गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. याशिवाय नांदेड विभाग से परभणी, सेलू, जालना, छत्रपती संभाजी नगर, मनमाड या मार्गावर लांब पल्ल्याच्या नांदेड – प्रयागराज, नांदेड – अयोध्या अश्या दोन नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नांदेड रेल्वे विभाग दक्षिण विभागाशी जोडल्या मुळे मराठवाड्याचा विकास खोळंबला आहे करिता हा विभाग महाराष्ट्रातील मध्य रेल्वे मुंबई या विभागाशी जोडण्यात यावा जेणेकरून मराठवाड्याचा विकास लवकरात लवकर होण्यास सोयीस्कर होईल. या सर्व मागण्यांची लेखी आणि रीतसर निवेदन तयार करून यावर तातडीने दोन महिन्याच्या अवधी मध्ये कारवाई करून सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्या असे रेल्वे महाप्रबंधक रेल्वे मंत्रालय यांना देण्यात आले आहे. महाप्रबंधक सुनील गुप्ता रेल्वे विभाग तथा रेल्वे मंत्रालय यांनी या सर्व मागण्यांची माहिती घेऊन त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी 13 खासदार, 7 आमदार आणि सर्व रेल्वे क्षेत्रीय सदस्य उपस्थित होते.








