एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत म्हसरूळच्या गॅमा अकॅडमीचे घवघवीत यश; २२ पैकी १८ विद्यार्थ्यांना यश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत म्हसरूळच्या गॅमा अकॅडमीचे घवघवीत यश; २२ पैकी १८ विद्यार्थ्यांना यश

प्रतिनिधी रवींद्र पाटील

नाशिक : संभाजीनगर येथील मराठा मंदिर मंगल कार्यालयात रविवार, ९ ऑगस्ट रोजी गॅमा अबॅकस, त्रिशूर (केरळ) यांच्या वतीने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत म्हसरूळ, नाशिक येथील गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी तब्बल १८ विद्यार्थ्यांनी विविध गटांत उल्लेखनीय यश संपादन केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून एकूण २८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याची आणि अचूकतेची परीक्षा घेणाऱ्या या स्पर्धेत केवळ ५ मिनिटांत १०० समीकरणे सोडविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले होते.

स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचे अर्थात चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे — समर्थ वसमत्कर (RB3), वरद चौधरी (X2), दिव्यम कवर (X3) आणि आरुष जाधव (C3).

द्वितीय क्रमांक पटकावत 1st Runner-Up ट्रॉफी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यजुर्व टिळे (RB4), परिधी राठोड (A2) आणि प्राची कोतकर (D3) यांचा समावेश आहे.

तर तृतीय क्रमांकाची 2nd Runner-Up ट्रॉफी ग्रितेश साबळे (RB4), दिव्यांश पगारे (X2) आणि शांभवी पाटील (A4) यांनी पटकावली.

याशिवाय कॉनसोलेशन ट्रॉफी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शरयू वानरे (X2), सेजल किंगरे (X2), राजवीर सोनवणे (A2), रुची पाटील (A4), अनिकेत खैरनार (C4), प्रणिती सोनवणे (D4), अनिष्क काटके (E4) आणि श्लोक मोरे (G) यांचा समावेश आहे.

धैर्य पवार, आरुष गरुड, साई भोने आणि परीक्षित साबळे या विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना गॅमा अबॅकसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. नागूलनाथन यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अकॅडमीच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत Abacus Academic Excellence Award 2026 देऊन क्लासचे संचालक गणेश कोतकर सर यांचा गौरव करण्यात आला.

या स्पर्धेतील यशामागे विद्यार्थ्यांना गॅमा अबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडमी, म्हसरूळ, नाशिकचे संचालक गणेश कोतकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकॅडमीचे, पालक आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link