एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस राजा बदलला तरी नांदेडचा गुंडाराज कमी नाही. महाराष्ट्रात पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यावर प्राण घातक हल्ला

पोलीस राजा बदलला तरी नांदेडचा गुंडाराज कमी नाही. महाराष्ट्रात पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यावर प्राण घातक हल्ला

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी

नांदेड- झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या उच्च राजकीय पदावरील पंजाब चे माजी उपमुख्यमंत्री स.सुखबिर सिंघ बादल यांचेवर नांदेड मध्ये प्राणघातक हल्ला झाला ही महाराष्ट्रा च्या सरकारसाठी व पोलीस प्रकाशनासाठी शरमेची घटना घडली आहे. व नांदेडचा पोलीस राजा बदलला पण गुंडा राज कमी झाला नसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचेच बिहारी राज बरे होते, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
पंजाब चे माजी उपमुख्यमंत्री सुखबिर सिंघ बादल हे 3 दिवसासाठी नांदेडच्या दौर्‍यावर आले होते.तर त्यांचेवर नांदेडच्या मातासाब गुरुद्वारा येथे प्राण घातक हल्ला झाला.ही घटना म्हणजे महाराष्ट्र शासनाला भारतात शरमेने मान खाली घालण्याची वेळ येऊन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या विशेष नांदेडच्या पोलीस दलाचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे. झेड प्लस सुरक्षा असणार्‍या नेत्यावर प्राणघातक हल्ला होणे ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे. नांदेड मध्ये गुंडागर्दी वाढली म्हणुन कोणत्यातरी नेत्याने पोलीस अधीक्षक अबिनास कुमार यांना हटवून छोटा जिल्हा असलेल्या हिंगोलीतील धडाकेबाज फलंदाज केलेले पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहण यांना नांदेडला आणून बसवले.असे दिसते. पण डॉ. रोहण नांदेड ला आल्यापासून इतर गुन्ह्यासह खुनाच्या ही घटना वाढून ७ खून झालीत. ७-८ दिवसापूर्वी तर एकाच दिवसी तीन खून होऊन मागील एकेच दिवसीय दोन खुनाचे रेकॉर्ड तोडले. पोलीस अधीक्षक डॉ रोहण नांदेडला रुजू झाल्यावर विविध क्षेत्रातून बातम्या एकूण नांदेडच्या नागरिकांना दिलासा वाटला होता. पण वाढत्या खुनाच्या घटनेमुळे व झेड प्लस सुरक्षा असलेल्या वरीष्ठ नेता पंजाबचा उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला झाल्यावर नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. समक्ष साक्षात पोलीस उपस्थित असताना हल्ला होतो तर आपल्या पासुन कोसो दूर असलेले व नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणारे पोलीस असलयाने आपले काय खरे असी भीती नागरिकात वाढत आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक पदावर शहाजी उमाप असताना इतकी गुंडागर्दी नव्हती. सध्या ते नांदेडचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक आहेत. तरी पण गुन्हेगारी पाश्र्वभूमी वाढली आहे. शहाजी उमाप पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकच असावे असे नागरिकांना वाटत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या साठी, नियुक्त्या साठी स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप व टेंडर पद्धत मुख्यमंत्र्यांनी बंद करावी. तसेच चार पदरी, सहा पदरी रस्ते, देखणे विमानतळ असा काही उच्चभ्रू व नेते लोकांच्या सोई सुविधांवर नागरिकांचा पैसा खर्च करण्यापेक्षा पोलीस दल वाढवण्याकरिता फडणवीसांनी जनतेचा पैसा खर्च करून नागरिकांचे संरक्षण वाढण्याची आज गरज आहे सध्या जवळपास पाच हजार नागरिका ला एक पोलीस तर एका नेत्याला दहा पोलीस असी परिस्थिती आहे. हे बदलले तरच गुंडागर्दी कमी होईल.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link