प्रतिनिधी रणजीत मस्के
—————————————————————————————————————————–
स्थानिक गुन्हे शाखेकडुन एम.आय.डी.सी. हद्दीतील गजराजनगर येथील बनावट सुगंधीत तंबाखु तयार करण्याचा कारखाना उध्वस्त, 03 आरोपींकडुन 13,92,190/- रुपये किमतीचे साहित्य जप्त.
——————————————————————————————————————————
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, बिरप्पा करमल, संतोष खैरे, शिवाजी कावडे, अरविंद भिंगारदिवे, उमाकांत गावडे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
दिनांक 18/04/2026 रोजी वरील पथक हे अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे असिफ खुदाबक्ष तांबोळी रा. मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर हा त्याचे साथीदारांसह कालीमाता मंदीराजवळ, गजराजनगर या ठिकाणी त्याचे घरामध्ये साधी तंबाखु आणुन त्यापासुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु तयार करण्याचा कारखाना चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर माहिती श्री राजेश बडे, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवुन त्यांना कारवाईकामी बोलावुन घेतले.
पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 इसम सुगंधीत तंबाखु तयार करतांना मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) असिफ खुदाबक्ष तांबोळी वय – 50 वर्षे, रा. मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर, 2) जफर चाँद शेख वय – 38 वर्षे, रा. बडी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर, 3) दाऊद बाबुमियाँ शेख वय – 42 वर्षे, रा. सदर बाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी घटनाठिकाणी पाहणी केली असता सदर ठिकाणी साधी तंबाखु आणुन सदर तंबाखुस रसायने, रंग, मिश्रीत करुन त्यापासुन बनावट सुगंधीत तंबाखु व पानामध्ये टाकण्याचा बनावट किवाम तयार करत असल्याचे कळविले.
ताब्यातील इसमांकडुन सुगंधीत तंबाखु तयार करण्याचे 3 मिक्सर, 600 किलो सुगंधीत तंबाखु, सुगंधीत तंबाखु पिशव्या सिल करण्याचे 03 मशिन, 15 किलो कलर, चुना, पॅराफिन रसायन, एअर कंप्रेसर, वजनकाटा, 90,000/- रुपये किमतीचे पानामध्ये टाकण्याचे बनावट किवाम, 6 इलेक्ट्रीक मोटारी, बनावट स्टिकर, पिशव्या तयार करण्याचे रोल, इतर साहित्य व टाटा सफारी गाडी क्रमांक एम.एच. 17 व्ही. 700 असा एकुण 13, 92,190/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोहेकॉ/492 सुनिल विनायक पवार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 255/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 318, 336, 340 सह अन्न सुरक्षा माणके अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 26 (2)(प), 26 (2)(पअ), 27(3)(d), 27 (3)(e), 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








