एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई; शस्त्रासह दरोड्याच्या तयारीतील दोघे जेरबंद

मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई; शस्त्रासह दरोड्याच्या तयारीतील दोघे जेरबंद

उपसंपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ एका स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या वेळी परिसरात नियमित गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलिसांच्या सेकंड मोबाईल पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून तपासणी सुरू केली.
पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकासह दोन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र वाहनात उपस्थित असलेल्या अन्य दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने वाहनाची कसून तपासणी करण्यात आली.
झडतीदरम्यान वाहनातून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल हँडसेट तसेच बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपासात घटनास्थळावरून पसार झालेला चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे यांसह विविध जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे सुमारे १८ गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम ३/२५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी चौकशी सुरू आहे.
*अटक करण्यात आलेले आरोपी :*
चंद्रकांत विष्णू वाघ
कैलास कारभारी घोडके
या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link