प्रा.नानाजी रामटेके यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न
कर्मवीर महाविद्यालयातून सेवानिवृत्ती
आरमोरी गोपाळ भालेराव. 5/10/2025:-
कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा( ठाणेगाव) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक नानाजी रामटेके हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.याप्रसंगी त्यांचा गोंडवन विकास संस्था नागभीडच्या वतीने सचिव रविंद्र जनवार यांनी पुष्पगुच्छ ,शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला तर महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य सुनील मेश्राम यांनी शाल श्रीफळ, भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले.त्याप्रमाणे सहाय्यक शिक्षिका अर्चना उके यांनी सौ.पुष्पा रामटेके यांचा पुष्पगुच्छ , साडी,चोळी देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव रविंद्र जनवार यांनी प्रा.रामटेके यांच्या शालेय योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.सत्काराला उत्तर देताना प्रा.रामटेके आपण केलेल्या सेवेचा विशेष उल्लेख केला आणि सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन सचिन जांभूळे,प्रास्ताविक व परिचय प्राचार्य सुनील मेश्राम तर आभार प्रमोद दिघोरे पर्यवेक्षक यांनी मानले.याप्रसंगी सर्व प्राध्यापक , शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








