अजय बोढारे यांची जिल्हा महामंत्री पदावर नियुक्ती
प्रतिनिधी सतीश कडू
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे त्यांची भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा रामटेक महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. शनिवार दिनांक 4/10/2025 रोजी हुडकेश्वर येथील दीप लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे जिल्हा कार्यकारणीचा कार्यक्रम संपन्न झाला असता जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदराव राऊत यांनी त्यांची नियुक्ती केली. 2004 पासून अजय बोढारे भाजपमध्ये काम करत असून युवा मोर्चा नागपूर जिल्हाध्यक्ष, नागपूर पंचायत समितीचे सभापती, भाजपा जिल्हा महामंत्री,विधानसभा निवडणूक प्रमुख अशा विविध जबाबदारीवर काम केले आहे. भाजप संघटनांची जबाबदारी पार पाडत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल नागपूर ग्रामीण तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अजय बोढारे यांनी या नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांना दिले आहे.
कपिल आदमने
प्रसिद्धी प्रमुख,भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा रामटेक








