सोलापूर हादरले, दोन दिवसांत तीन महिलांच्या हत्या, सोलापूर आता अनैतिक संबंधातून पत्नीचा खून पतीनेही संपविले जीवन..
प्रियांका देशमुख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापुरात मागील दोन दिवसांत तीन महिलांच्या हत्या झाल्याच्या घटना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर नोंद झाली आहे. अशातच गुरुवारी सोलापुरात मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चारित्र्यांच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून स्वतःही किचन रूम मध्ये पत्र्याच्या अँगला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवुन जीवन संपविले आहे, अंबिका अशोक अंबिगार (वय 40 ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर अशोक सदाशिव अंबिगार ( वय 49 ) दोघेही रा. औराद) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या पती-पत्नीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत होते. अशोक ने अनेक वेळा पत्नीला ठार मारण्याची धमकी देखील दिली होती, पत्नीचा जीव घेवुन त्याने स्वतः देखील किचन रूम मध्ये गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे. अशोक अंबिगार हा ट्रक चालक होता यातून आपल्या कुटुंबाची तो उपजीविका भागवत होता. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नी अंबिका आणि पती अशोक यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला मात्र हा वाद चांगलाच विकोपाला गेला, त्याने थेट पत्नीला संपून स्वतःलाही संपविले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी गावचे पोलीस पाटील सैपन बेंडगे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याला कळवले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी आपल्या पोलीस ठाण्याकडे कर्मचाऱ्यांना घेवुन घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे








