एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आणि डोळे पाणावले

आणि डोळे पाणावले

बदलापूर मुंबई येथे मोफत व्हीलचेअर भेट मधु तारा

चार वर्षापासून दिव्यांग चिमुरड्याला व्हीलचेअरची मागणी करणाऱ्या शिंदे परिवाराच्या व्हीलचेअरच्या मागणीला मधु ताराची मोफत व्हीलचेअर सेवा.
*दिनांक 1 जून 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी मुंबई येथील बदलापूर पूर्व येथील जोवेली गावात राहणाऱ्या डी एम डी मस्क्युलर डिस्ट्रोफिन या आजाराने ग्रस्त असलेल्या 11 वर्षाच्या अर्णव श्रीधर शिंदे या चिमुकल्याला पुण्याहून मोफत व्हीलचेअर भेट त्याच्या बदलापूर येथे घरी नेऊन देण्यात आली.*
*या वेळी मधु तारा फाऊंडेशनचे मुंबई पदाधिकारी कल्याण शहराध्यक्ष राज्य उपाध्यक्ष श्री राहुलजी वारे.ठाणे जिल्हा प्रमुख श्री उमेशजी प्रजापती. राज्य उपाध्यक्ष एड योगीताजी सावंत उपस्थित होते.*
*6 वर्षाचा असताना डी एम डी या गंभीर आजारामुळे अर्णवचे दोन्ही पाय कंबरे पासून हालचाल करणे बंद झाले अनेक उपचार करून देखील काही यश आले नाही अर्णवच्या दीदीचे शिक्षण थांबले आर्थिक परिस्थिती ढासळली अशात अर्णवला मोकळ्या हवेत बाहेर नेण्यासाठी ठाणे मनपा.दिव्यांग संस्था अशा* *अनेकांना चार वर्षापासून व्हीलचेअर मिळावी म्हणून वारंवार विनंती करूनही* *व्हीलचेअर मिळाली नाही आणि आज मधु तारा फाऊंडेशन प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी* *पुण्याहून घरी येऊन व्हीलचेअर मोफत भेट केल्या बद्दल त्यांचे व उपस्थित मधु तारा पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.*
*ही सेवा बदलापूर येथे रहाणाऱ्या मूकबधीर मुलाच्या मातोश्री सुवर्णाताई शिरसाठ यांनी मधु तारा प्रमुखांना सांगितल्या मुळे घडली.*
*आपलाही दिव्यांग मुलगा आहे आपणही समाजाच देणं लागतो ही भावना जोपासणाऱ्या सुवर्णाताई यांना मधु तारा प्रमुखांनी या वेळी बदलापूर ठाणे जिल्हा प्रमुख घोषित केले.*
*ही व्हीलचेअर पुण्यातील* *आशाताई यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या स्मरणार्थ भेट दिली.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link