खोटे सोन्याचे बिस्कीट दाखवून फसवणारी टोळी जेरबंद, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई:
प्रतिनिधी प्रकाश कांबळे
लातूर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
📍दि. २२ मे २०२६ रोजी औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात छापा टाकून आरोपी बाबाराव सूर्यकांत जाधव, केशव छगन जाधव व संदीप दगडू जाधव (रा. सलगरा, ता. जि. लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
🔹 हे आरोपी महिलांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरी करीत होते.
🔹 बसस्थानके, रुग्णालय परिसर व गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू व चोरीचे गुन्हेही त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
👮♂️ श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर व श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
👮♂️ श्री. अक्षय जाधव, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि श्री. प्रमोद देशमुख तसेच पोलीस अंमलदार श्री. सूर्यकांत कलमे, श्री. संजय कांबळे,








