एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न फसला; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपी जेरबंद

*शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न फसला; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपी जेरबंद!*

प्रतिनिधी | अशोक पाचुंदकर

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत सरदवाडी येथे एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत इंदुबाई सखाराम चौधरी (वय 74 वर्षे, व्यवसाय – पीठ गिरणी चालक, रा. वरची आळी, सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक 23 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.59 वाजण्याच्या दरम्यान त्या त्यांच्या पिठाच्या गिरणीशेजारी भुईमुगाच्या शेंगा फोडत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी रवींद्र संभाजी पगारे (वय 35, रा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व कुणाल सतीश पवार (वय 21, rा. हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) हे एमएच 16 डीएक्स 1030 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून तेथे आले.
दोघांनी खोली भाड्याने घेण्याचा बहाणा करत इंदुबाई चौधरी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आरोपी रवींद्र पगारे याने त्यांच्या गळ्यातील सुमारे तीन ग्रॅम वजनाची अंदाजे 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत हिसका देऊन ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे मोटरसायकलवरून पळून जात असताना परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link