एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकींचा उलगडा; एक जेरबंद, दुसरा पसार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकींचा उलगडा; एक जेरबंद, दुसरा पसार

प्रतिनिधी | प्रणित काठोके

भुसावळ शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी वाहनांचा संयुक्त कारवाईत उलगडा करण्यात आला. भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाणे आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने ही कारवाई करत सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक इराणी मोहल्ला परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, रजा टॉवर परिसरातील एका घराच्या बाजूला संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या तीन दुचाकी आढळून आल्या. संबंधित वाहनधारकांचा शोध घेतला असता कोणीही पुढे आले नाही.
यानंतर पोलिसांनी तिन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकांच्या आधारे पडताळणी केली. तपासात या गाड्या अनुक्रमे मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पल्सर(MH 19 ES 3555) , पल्सर एन-१६० (MH 19 ET 3380) आणि केटीएम ड्यूक २५० (MH 16 DT 7433) या दुचाकींचा समावेश आहे.
या कारवाईत हसन अली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले असून सलमान अली हुजूरअली इराणी हा आरोपी सध्या फरार आहे. प्राथमिक तपासात दोघांनी मिळून या दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक Maheshwar Reddy, अपर पोलीस अधीक्षक Ashok Nakhate, विभागीय पोलीस अधिकारी Kedar Barbole, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक Rahul Gaikwad तसेच निरीक्षक Rahul Wagh यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पीएसआय रवि नरवाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, जप्त वाहनांबाबत पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link