चला आळंदीला जाऊ इंद्रायणी स्वच्छ करू जगद्गुरूंचा आदेश पाळू
सनातन धर्माचे रक्षण करू
पुणे प्रतिनिधी शारदा शेंडकर
रमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व प्रभू अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या कृपा आशीर्वादाने
शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी
आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथे इंद्रायणी स्वच्छता अभियान
राबवण्यात आली
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत सोपान देव चांगदेवाला ज्ञान देणारी सर्वश्रेष्ठ मुक्ताई या पवित्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी नगरीमध्ये विशेषतः सनातन हिंदू शास्त्रामध्ये अधिक महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे अशा पवित्र महिन्यामध्ये सद्गुरुंनी सांगितल्या प्रमाणे महापुण्य मिळवण्याची संधी दिली होती असे भक्तांनी मनात धरून सेवा पार पाडली सद्गुरु हे त्रिकाज्ञाने असतात भविष्यकाळ ,वर्तमानकाळ, भूतकाळ यांची त्यांना जाणीव असते
आपल्या शिष्याला या जन्मात मुक्ती मिळावी त्याला आत्मज्ञान मिळावे आणि भवसागरातून मुक्तता मिळावी हा त्यांचा अहोरात्र प्रयत्न असतो
पण आपण संसारी माणसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अध्यात्मिक अधोगती करून घेतो असे मत ह्यावेळी भक्तांनी व्यक्त केले
माऊली कायम सांगतात मी जे जे काही सांगतोय ते मनापासून करा तुम्हाला याच जन्मात आत्मज्ञान मिळणार अशी आपल्या गुरूंची शपथ घेऊन ते सांगतात जर सद्गुरु आपणाला एवढा विश्वास देत असतील तर आपण त्या वाक्यावर विश्वास ठेवून सेवेमध्ये सहभागी झाले च पाहिजे असे अनेकांचे मत होते
कारण मृत्यूनंतर आपला प्रवास कसा असणार आहे ते फक्त तेच जाणतात आपण कधी जाणार आहोत आपल्या मृत्यूनंतरचा प्रवास आपला कसा असणार आहे आणि आपला सर्व त्रास कमी व्हावा आणि आपल्या शिष्याला लवकरात लवकर मुक्ती मिळावी यासाठी या ना त्या कारणाने त्याला सेवेत घेऊन त्याचं पुण्य वाढवून त्याची सात्विकता वाढवण्यासाठी जगद्गुरु श्रींचा आपल्या प्रभूंचा हा प्रयत्न कायम असतो आणि या स्वामींच्या आदेशाचे पालन करून सर्वांनी कार्य पार पाडले
इंद्रायणी स्वच्छता अभियान या कार्यक्रमांसाठी सर्व भाविक भक्त उपस्थित होते








