एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सहदेवनगरच्या सुरक्षिततेला प्राधान्य; ठोस उपाययोजनांची मागणी

सहदेवनगरच्या सुरक्षिततेला प्राधान्य; ठोस उपाययोजनांची मागणी

चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मांडल्या विविध सुरक्षा उपाययोजनांच्या सूचना

प्रतिनिधी रवींद्र पाटील

पोलीस-नागरिक समन्वयावर भर आवश्यक

 

नाशिक : सहदेवनगर परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या छोट्या-मोठ्या घटना, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ तसेच सुरक्षेच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात सहदेवनगर येथील रहिवाशांसोबत सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
“नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊ,” असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजयदादा बोरस्ते यांनी केले. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यात योग्य समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत सहदेवनगर परिसरातील सर्व सोसायट्या यांनी इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणेची नियमित तपासणी करणे, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसविणे तसेच त्यांचे योग्य निरीक्षण करणे, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
तसेच पंपिंग स्टेशन परिसर व वळणाच्या ठिकाणी फेन्सिंग करणे, झाडांच्या फांद्या छाटणे आणि अपघातप्रवण ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर (बहिर्वक्र आरसे) बसविणे, अशा उपाययोजनांवरही चर्चा झाली.
सहदेवनगरला प्रवेशद्वार (Entry Gate) उभारणे, परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नोंद ठेवणे तसेच अनधिकृत अथवा छुपे मार्ग बंद करून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, अशी मागणी नागरिकांनी केली.
परिसरात नव्याने येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी व भाडेकरू यांची ओळखपत्रांची तपासणी आणि आवश्यकतेनुसार पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असलेले संभाव्य Leakage Points शोधणे, परिसराचा Lane-wise व Building-wise Survey करणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी नानासाहेब सूर्यवंशी, नारायण जाधव, भास्करराव भावसार, संजय शिंदे, सुरेश देवरे, शरद हिरे, संतोष कापडणेकर, भाऊसाहेब कोल्हे, अशोक कहाणे, भागवत गागुंर्डे, प्रसन्न टिल्लू, संदीप बडगुजर, मंगेश वाघ, विलास कातकडे, अनिल बाफना, संजय निकम, महेंद्र पटेल, स्वप्नील भोजने, प्रशांत मोगल, गिरीश कुलकर्णी, दिनकर चव्हाण, सुशांत गाडे, अनिकेत रामदासी, मनोज दसपुते, राज पवार, दिनेश देवी, बाळासाहेब जाधव, शुभम घुले, प्रतीक चोथवे, रविंद्र पाटील, विवेक सावंत, यश शिंदे, यश शिरसाट, अरिहंत खैरनार, धीरज पाटील, हर्ष शिरसाट, सोहम चांदवडकर, यश कहाणे, सौ. प्रतिभा कुलकर्णी,सौ.स्नेहा सावंत, सौ. मालती भावसार,सौ.स्मिता बडगुजर,सौ.मनिषा कहाणे, सौ. ज्योती देवी, सौ. आदिती रामदासी, श्रीमती मालती मंडलिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल चौधरी यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link