एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

इंधन पुरवठा सद्यस्थिती आढावा: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरचित्रवाणी परिषद संपन्न जिल्ह्यात इंधनाचा पर्याप्त साठा

*॥ इंधन पुरवठा सद्यस्थिती आढावा: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरचित्रवाणी परिषद संपन्न जिल्ह्यात इंधनाचा पर्याप्त साठा॥*

जळगाव | प्रणित काठोके

जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलची उपलब्धता आणि वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि इंधन कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची दूरचित्रवाणी परिषद (Video Conference) पार पडली.

📍 बैठकीतील प्रमुख उपस्थिती:
या परिषदेत जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व पोलीस निरीक्षक तसेच प्रमुख इंधन पुरवठादार कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी सहभागी झाले होते.

📍 बैठकीतील प्रमुख चर्चेचे मुद्दे:
तालुकास्तरीय आढावा: प्रत्येक तालुक्यातील पेट्रोल पंपांवरील इंधनाचा सद्यस्थितीतील साठा आणि वितरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

उपलब्धतेची खात्री: जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन वाटपानंतर सद्यस्थितीला तुटवडा किंवा “नो स्टॉक” अशी परिस्थिती उद्भवली आहे काय, याची प्रत्यक्ष माहिती क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून संकलित करण्यात आली.

📍 सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश:
१. नियमित क्षेत्रीय पाहणी: सर्व उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपांना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच पुरवठा तपासणी अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा.
२. कायदा व सुव्यवस्था: पेट्रोल पंप परिसरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी किंवा अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियमित गस्त घालून कायदा व सुव्यवस्था नियंत्रण राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३. तातडीने पुरवठा साखळी: ज्या पंपांवरील साठा कमी झाला असेल, तेथे प्राधान्यक्रमाने व तातडीने इंधनाचा पुरवठा उपलब्ध करून दिला जावा अशा स्पष्ट सूचना इंधन पुरवठादार कंपन्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.

महत्वाचे :- जिल्ह्याच्या पेट्रोल या इंधनाच्या एकुण मागणीपेक्षा (671 KL) साधारणत: 3 पटीने प्रत्यक्ष पुरवठा साठा उपलब्ध (1723 KL)असुन मागणीपेक्षा जास्त पेट्रोल पुरवठा Transit मध्ये (871 KL)आहे.
त्याचप्रमापणे जिल्ह्याच्या डिझेल या इंधनाच्या एकुण मागणीपेक्षा (1440 KL) साधारणत: 1.5 पटीने प्रत्यक्ष पुरवठा साठा उपलब्ध (1949 KL) असुन मागणीपेक्षा जास्त डिझेल पुरवठा Transit मध्ये (1756 KL)आहे.

प्रशासकीय संदेश: ✨
जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी निरंतर सुरू ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिक व ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.

“जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवणे हे प्रशासनाचे मुख्य दायित्व आहे. पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वितरणावर बारीक लक्ष ठेवावे.”

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link