प्रतिनिधी: सतीश कडू
नागपूर, 31 मे 2025: “शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र” ही संकल्पना घेऊन महावितरण कंपनी आपला 20 वा वर्धापनदिन दि. 6 जून रोजी साजरा करत आहे. या निमित्ताने येत्या 1 ते 6 जून 2025 या कालावधीत राज्यभरात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांद्वारे विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाची सुरुवात रविवार, 1 जून रोजी नागपूर परिमंडलाच्या काटोल रोड येथील विद्युत भवन येथे सकाळी 7 वाजता ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनच्या आयोजनाने होत आहे.
विद्युत भवन ते गड्डीगोदाम पर्यंत आयोजित या मॅरेथॉनमध्ये महावितरणचे अधिकारी व कर्मचारी विद्युत सुरक्षा या विषयावर जनजागृती करतील. सोबतच महावितरण कार्यालये, रोहित्रांच्या पेट्या, आर.एम.यू., डिजिटल बोर्ड, शिडी गाड्या, उपकेंद्रे, तक्रार निवारण केंद्रे, ग्राहक सुविधा केंद्रे आणि निवासी परिसरात विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावून जनजागृती करतील. याशिवाय या संपुर्ण सप्ताहात रॅली, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल आणि एसएमएस पाठवले जातील. तसेच, भित्तीपत्रके, चित्रफिती, समाज माध्यमे, रेडिओ, टी.व्ही. आणि प्रिंट मीडिया यांसारख्या विविध माध्यमांतून विद्युत सुरक्षेचा संदेश घराघरात पोहोचवला जाईल.
या मॅरेथॉनचा मुख्य उद्दिष्ट लोकांना विजेच्या धोक्यांबद्दल आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल शिक्षित करणे हे होते. विजेच्या तारा तुटल्यास काय करावे, घरगुती उपकरणांचा सुरक्षित वापर कसा करावा, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, आणि वीज अपघात घडल्यास प्रथमोपचार कसे करावेत याबद्दलची माहिती या मॅरेथॉनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देण्यात येणार आहे. .
या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन सारख्या उपक्रमांनी महावितरणची केवळ वीज वितरण करणारी संस्था म्हणून नव्हे, तर एक जबाबदार सामाजिक संस्था म्हणून प्रतिमा अधिक उज्वल करेल. विद्युत सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर लोकांमध्ये जागृती करून, महावितरण संभाव्य अपघात टाळण्यास आणि समाजातील प्रत्येक घटकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास मदत करत आहे. ‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रीदवाक्य या उपक्रमांद्वारे खऱ्या अर्थाने साकार होत आहे.
या ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन सारख्या उपक्रमांनी महावितरणची केवळ वीज वितरण करणारी संस्था म्हणून नव्हे, तर एक जबाबदार सामाजिक संस्था म्हणून प्रतिमा अधिक उज्वल करेल. विद्युत सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर लोकांमध्ये जागृती करून, महावितरण संभाव्य अपघात टाळण्यास आणि समाजातील प्रत्येक घटकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास मदत करत आहे. ‘आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार’ हे ब्रीदवाक्य या उपक्रमांद्वारे खऱ्या अर्थाने साकार होणार आहे. महावितरण नेहमीच आपल्या ग्राहकांना सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा देण्यास कटिबद्ध आहे. याच ध्येयाचा एक भाग म्हणून, विद्युत सुरक्षेचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणने ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये नागरिक, विद्यार्थी आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त उत्सफ़ुर्त सहभागी होण्याचे आयोजन नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
