एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

खुरणा पंपा जवळील नाली संपूर्णपणे बुजल्याने नागरिक त्रस्त

हिंगोली शहर प्रतिनिधी
आकाश जगताप

हिंगोली

शहरातील *खुरणा पंपा जवळील नाली संपूर्णपणे बुजल्याने* गटाराचे घाण पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या आहे, मात्र *नगर परिषदेचे दुर्लक्ष* असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

*रस्त्यावर घाण पाण्याचा राडा*
नाली बुजल्यामुळे सांडपाणी पूर्ण रस्त्यावर साचले आहे. दुचाकी, चारचाकी आणि पादचारी नागरिकांना याच घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांना सर्वात जास्त त्रास होत आहे.

*आरोग्याला धोका*
रस्त्यावर साचलेल्या या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डास, माश्या आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की _”या पाण्यामुळे टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती आहे. पण अधिकारी याकडे बघायलाच तयार नाहीत.”_

*नगर परिषद गप्प*
वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेकडून नाली सफाई किंवा पाणी उपसण्याची कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

*मागणी*
तातडीने नालीची सफाई करून गटाराचे पाणी बंद करावे, अन्यथा नागरिक आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

प्रशासन वेळीच जागे होणार का, की एखादा आजार फैलावल्यावरच कारवाई होणार?

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link