श्रावण महिन्यानिमित्त राजयोग रिक्षा स्टॅन्डवर सत्यनारायणाची पूजा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी महालिंग स्वामी
पुणे : सिंहगड रोड येथील राजयोग रिक्षा स्टॅन्ड येथे श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त सत्यनारायणाची पूजा धार्मिक वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यावेळी रिक्षा स्टॅन्डवरील सर्व पदाधिकारी, रिक्षाचालक तसेच रिक्षा संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व असलेला महिना मानला जातो. या निमित्ताने राजयोग रिक्षा स्टॅन्डच्या वतीने सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. विधिवत पूजा, आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने महालिंग स्वामी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित सर्व रिक्षाचालक, पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधून धार्मिक कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तसेच रिक्षाचालकांच्या एकजुटीमुळे संघटनेची ताकद वाढते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, रिक्षाचालक, सदस्य व उपस्थित मान्यवरांचे महालिंग स्वामी यांनी मनःपूर्वक आभार मानले. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान लाभावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पूजा संपल्यानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.







