एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगांवचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी पदभार स्वीकारला; जळगांव जिल्ह्याचा दांडगा अनुभव!

जळगांवचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी पदभार स्वीकारला; जळगांव जिल्ह्याचा दांडगा अनुभव!

(जळगांव जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी.

जळगांव जिल्ह्याचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी शनिवारी दुपारी मावळते पोलीस अधीक्षक अशोक नेखाते यांच्याकडून पदभार स्वीकारला अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे नव्या अप्पर पोलिस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अशोक नखाते यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या बदलीचा स्वतंत्रपणे आदेश जारी करण्यात येणार आहे. मावळते अप्पर अशोक नखाते यांनीही आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास आणि बंदोबस्ताचे काम चोख बजावले, नेहमीच प्रयत्नशील राहिले, तर नव्याने आलेले अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांना जळगांव जिल्ह्याचा दांडगा अनुभव आहे. जळगांव जिल्ह्याशी जुनं नातं आहे. यापूर्वी त्यांनी शहरांत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही यशस्वी कार्यकाळ भूषवला आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा जळगांवकरांना नक्कीच होणार आहे असे आता बोलले जात आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link