एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रूटमार्च काढूण पोलिस प्रशासनाने केले पथसंचलन

रूटमार्च काढूण पोलिस प्रशासनाने केले पथसंचलन
——————————
प्रतिनिधी / अनिल चव्हाण.

सेलू शहरात पोलीस प्रशासनाचा पथसंचलन (रूटमार्च); दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
बकरी ईदच्या पार्श्वभूमी वर शहरात पथसंचलन..
आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने आज पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत प्रॉपर सेलू शहरात भव्य ‘रूटमार्च’ (पथसंचलन) चे आयोजन करण्यात आले होते.
या रूटमार्च दरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत दंगा काबू योजनेची रंगीत तालीमही यशस्वीपणे पार पाडली.
आज सकाळी ठीक १०:०५ वाजता पोलीस ठाण्यातून या रूटमार्चला सुरुवात करण्यात आली. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त राखण्यासाठी या पथसंचलनात पोलीस दलाचा मोठा ताफा उतरला होता. यामध्ये ०५ पोलीस अधिकारी, २६ पोलीस अंमलदार, २५ आरसीपी (RCP) प्लाटून अंमलदार, २३ एसआरपीएफ (SRPF) चे अंमलदार आणि २२ होमगार्ड अशा एकूण १०१ जणांच्या फौजफाट्याने सहभाग घेतला होता. शहरातील मुख्य मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत हा रूटमार्च सकाळी ११:२० वाजता संपन्न झाला.
हा रूटमार्च शहरातील मुख्य भागांतून मार्गक्रमण करत असताना सेलू येथील आठवडी बाजार मैदानावर आला. या ठिकाणी अचानक निर्माण होणाऱ्या आपत्कालीन व कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचे, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ‘दंगा काबू योजनेची’ (दंगल नियंत्रण) रंगीत तालीम घेण्यात आली. या तालीमी दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गॅसगनद्वारे (Gas Gun) ०१ सेल फायर करण्यात आला “शहरात आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या यशस्वी रूटमार्चमुळे आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे सेलू शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या शिस्तीचे कौतुक केले जात आहे.

 

***

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link