एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलिस निरिक्षक संदिप बोरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाले शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

पोलिस निरिक्षक संदिप बोरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाले शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

मानवत / प्रतिनिधी. अनिल चव्हाण
———————————

मानवत पोलिस प्रशासन व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती ,यांच्या संयूक्त विद्यमाने परभणी जिल्हा व मराठवाडा विभागाच्या वतीने
शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवत पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवत पो.स्टे येथे एक कार्यक्रम घेऊन शहरातील होतकरू गरीब शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मानवत पो.स्टेचे पोलिस निरिक्षक संदीप पाटील बोरकर यांच्या मार्गदर्शना खाले करण्यात आले.
मानवत पोलीस स्टेशन येथे शालेय साहित्याचे वाटप दिनांक १२/०४/२०२६ रोजी
सविस्तर वृत्त असे की मानवत पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. रेखाताई मनेरे आणि मानवत पोलिस प्रशासन यांचा मागदर्शना खाली इयत्ता पहिले ते चौथीच्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना मानवत पो.स्टेचे पोलीस निरीक्षक मा. संदिप बोरकर पाटील यांच्या हस्ते शालय शैक्षणिक साहित्य करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मानवत पो.स्टेचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संदिप बोरकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून – सह पोलिस उपनिरीक्षक पंतंगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून – पोशि. बंकर लटपटे, पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ. रेखाताई मनेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन- महिला पोलीस जयश्रीताई मुंढे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले, पोलीस कर्मचारी नरेंन्द्र कांबळे व ज्ञानेश्वर चोपडे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करून परिश्रम केले दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण विविध उपक्रम घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची संयुक्त जयंती निमित्त उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सौ.रेखा मनेरे , मराठवाडा अध्यक्ष शेख अजहर हादगवकर, मराठवाडा संघटक अहेमद अन्सारी, , शेख इफ्तेखार बेलदार जिल्हा सचिव, जिल्हा अध्यक्ष जयश्री पुंडगे, अंतिका वाघमारे,मीराताई नाईक, छायाताई अंभोरे, शेख शमीना, सुमनताई साळवे,व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक संदिप बोरकर साहेब यांनी समितीच्या कार्याचं कौतुक करून अभिनंदन केले व त्यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
मानवत पोलीस स्टेशन येथे शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात आले संयुक्त जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य, व महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ.रेखाताई मनेरे व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12/04/2026 रोजी मानवत पोलीस स्टेशन येथे पहिली ते चौथी विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात आले दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण विविध ठिकाणी जयंती निमित्त उपक्रम राबविण्यात आले.

 

****

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link