तोतया पत्रकारांचा खंडणीचा गोरखधंदा! अधिकाऱ्यांनी घ्यावी तातडीने खबरदारी
मनोज उराडे प्रतिनिधी गडचिरोली :
दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यात काही व्यक्ती स्वतःला “पत्रकार” म्हणून सादर करत शासकीय कार्यालयांत धुडकावून खंडणी वसुलीचा गोरखधंदा सुरू केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. हे तथाकथित पत्रकार हातात बनावट आयडेंटी कार्ड घेऊन, “आम्ही अमुक वृत्तपत्रातून आलो आहोत” असा दावा करत अधिकाऱ्यांकडून उघडपणे पैशांची मागणी करत असल्याचे समजते. या तोतया पत्रकारांचे बळ दिवसेंदिवस वाढत असून, काही अधिकारी चौकशी न करता त्यांच्या दबावाखाली आर्थिक व्यवहार करत असल्याने या गैरप्रकाराला अधिक खतपाणी मिळत आहे. परिणामी प्रामाणिक, शासनमान्यता प्राप्त पत्रकारांच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. जनतेला आणि अधिकाऱ्यांना आवाहन :
अशा खोट्या पत्रकारांची ओळख पटवण्यासाठी कोणतीही व्यक्ती पत्रकार असल्याचा दावा करत असल्यास तात्काळ जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा , त्यांचे ओळखपत्र आणि संबंधित वृत्तपत्राचा RNI क्रमांक पडताळावा. फक्त शासनाच्या जाहिरात यादीवरील मान्यताप्राप्त वृत्तपत्रांचे पत्रकार आणि संपादक यांनाच अधिकृत मान्यता आहे.
अधिकाऱ्यांनी सावधान राहा!
कोणतीही व्यक्ती “पत्रकार” असल्याचे सांगत कार्यालयात आली, तर कोणत्याही परिस्थितीत आर्थिक व्यवहार करू नका. प्रथम त्यांची खरी ओळख, माध्यमसंस्थेची वैधता आणि परवानगी क्रमांक यांची खात्री करूनच प्रतिसाद द्या.
तोतया पत्रकारांमुळे खऱ्या पत्रकारितेची प्रतिमा कलंकित होत आहे प्रशासनाने अशा घटकांविरुद्ध कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.








