पोलीस आयुक्तांनी अखेर भाकरी फिरवली, नाशिक शहरांत 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या… पोलीस आयुक्त संदीप कार्णिक यांचे आदेश..!!
प्रियांका देशमुख नाशिक जिल्हा प्रतिनिधी
राजकीय दबाव आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक पोलीस विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जाही केले आहेत. काही महिन्यांपासून शहरांतील वाढती गुन्हेगारी हा विषय चर्चेत राहिला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 42 हत्यांची नोंद झाली आहे. शहरांतील तरुणाईला अंमली पदार्थाचा विळखा बसत आहे. अवघ्या दीड वर्षांवर शहरांत कुंभमेळा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर नाशिकची गुंडनगरी अशी तयारी होणारी प्रतिमा बदलण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे ) शिवसेना ( उद्धव ठाकरे ) मनसे या राजकीय पक्षांनी गुन्हेगारी विरोधात आवाज उठवणे सुरू केले होते. चहू बाजूकडूंन होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील नाशिक शहर चे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये अंबड गंगापूर इंदिरानगर भद्रकाली सातपुर आडगांव एमआयडीसी चुचाळे मुंबई नाका शहर वाहतूक शाखा सातपुरा युनिट शहर द्वारका शहर वाहतूक शाखा अशा पोलीस ठाण्यात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तसेच बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नियुक्त केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.








