एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पतीशी अनैतिक संबंध,संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या

पतीशी अनैतिक संबंध,संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!

प्रतिनिधी रणजीत मस्के

पुण्यात वकील पतीशी अनेक संबंध असल्याचा संशयातून वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने कार्यालयातील विवाहित महिला सेक्रेटरीची हत्या केली आहे. कथित प्रेयसीचे हात पाय बांधून बॅटने डोकं आणि तोंड ठेचून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरांतून समोर आली आहे. याप्रकरणी वकील संजय सावंत आणि त्याची पत्नी स्वाती सावंत यांना अटक केली आहे. त्याच्यासह 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला देखील चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुनम दिनेश मुन (वय 32) रा. गणेशनगर येरवडा) असे या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून अँड संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत हिला पतीच्या कार्यालयातील काम करणाऱ्या विवाहित महिला पूनम मुन तिचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पुनम मुन ही गेले साडेतीन वर्ष अँड संजय सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. मात्र तिचे आणि आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयच्या पत्नीला होता आणि याचाच राग मनात धरून तिने पतीच्या प्रेयसीची हत्या केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अवघ्या 6 तासांत खुनाचा छडा लावला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. माझ्या पती समवेत अनैतिक संबंध असल्या कारणांतून विवाहित प्रेयसीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक चंदननगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी धाव घेतली.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link