एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी अटक

टँकरमधून गॅस चोरणाऱ्या
आरोपीला ४ वर्षांनी अटक

प्रतिनिधी मुकुंद मोरे

रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्यातील एका फरार आरोपीला तब्बल चार वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. बुधाराम रामलाल वय ४२, रा. हिम्मत नगर, चंदनपुरा, ता. लोहावर, जि. जोधपूर, राजस्थान असे त्याचे नाव असून, त्यालाम बुधवारी रात्री पनवेल येथून अटक करण्यात आली.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात सन २०२२ मध्ये भारतीय दंड विधान कलम संहिताचे कलम ३८१, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे चोरट्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले होते.
रत्नागिरी पोलिस दलाने एआय आधारित रेडस् ॲप विकसित केले आहे. त्या ॲपच्या आधारे आरोपीचे चित्र पुनर्निर्मित केले. या चित्राच्या आधारे मुंद्रा (गुजरात) येथे त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, तो मुंबईत आल्याचे कळल्यानंतर पथक मुंबईत दाखल झाले आणि पनवेल येथून त्याला ताब्यात घेतले. पथकाने पनवेल येथील कळंबोली सर्कल येथून त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. त्याला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link