एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

प्रियकराच्या प्रेमासाठी जन्मदात्या आईनेच 6 वर्षाच्या मुलाला संपविले,दक्षिण महाळुंगेच्या पोलिसांनी आई अन् प्रियकराला ठोकल्या बेड्या

प्रियकराच्या प्रेमासाठी जन्मदात्या आईनेच 6 वर्षाच्या मुलाला संपविले,दक्षिण महाळुंगेच्या पोलिसांनी आई अन् प्रियकराला ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी रणजीत मस्के

! प्रेमासाठी जन्मदाती आई प्रियकरांसाठी झाली वेडी प्रेम हे आंधळे असतं असं म्हणतात ते अगदी खरं आहे. आणि आणि याच प्रेमात आंधळी झालेल्या आईने अवघ्या पोटच्या सहा वर्षाच्या मुलाचा प्रियकरांच्या मदतीने जीव घेतला आहे. मुलाच्या आजोबांमुळे आई आणि प्रियकराचं बिंग फुटलं आहे. याबाबत दक्षिण महाळुंगे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून बसरीन मेहबुब शेख (वय 27) रा. कुरूची ता. खेड रा. धर्मापुरी ता. परळी जिल्हा बीड) तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड कुरूवी ता. खेड मूळ ता. अंबाजोगाई जि. बीड ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बसरीन शेख ही विवाहित असून तिला तीन अपत्ये आहेत. पण काही किरकोळ वादांतून ती नवऱ्यापासून विभक्त राहते दोन मुलै तिच्या नवऱ्याकडे आहेत तर सहा वर्षाचा अवेज हा तिच्याकडे होता. मात्र तिला आपल्या प्रेम संबंधात अवेज हा अडसर ठरत होता. बसरीन शेख आणि राम केजवाड या दोघांच्या अनेक संबंधाची माहिती कुटुंबाला चांगलीच होती. अखेर आपल्या नात्यात अडसरा ठरणाऱ्या अवेज (वय 6 ) याला संपवण्याचे तिने आणि तिच्या प्रियकराने ठरवले होते. अखेर या दोघांनी त्याला बादलीत पाण्यात बुडवून भिंतीवर आपटून त्याला अखेर ठार मारले, त्यानंतर आपल्या माहेरी बीड कडे अवेज याचा मृतदेह घेऊन ती गेली होती. आणि हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असे तिने सांगितले, पण आजोबांना चांगलाच संशय निर्माण झाला होता. त्यामुळे पोस्टमार्टम आलेल्या रिपोर्ट मधून परळी पोलिसांनी देखील तपासाची चक्रे चांगलीच गतिमान केली. आणि या प्रकरणात बसरीन शेख आणि तिचा प्रियकर राम कजेवाड या दोघांना ताब्यात घेवुन पॉलिसी खाक्या दाखवताच या दोघांनीही गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आमच्या अनैतिक संबंधात अवेज हा अडसरा ठरत होता. या घटनेमुळे प्रेमात वेड्या झालेल्या आईने पोटच्या सहा वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे. अखेर परळी पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड दक्षिण महाळुंगे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय ढमाळ अधिक तपास करीत आहेत.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link