सोनारास अडवून चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या इसमांना स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केले जेरबंद.
प्रतिनिधी रणजीत मस्के
दिनांक 21/05/2026 रोजी फिर्यादी नामे नितीन सोनाजी निकम वय 30 वर्ष व्यवसाय सोने चांदीचे दुकान रा.पालोद ता.सिल्लोड जि.छत्रपती संभजीनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 20/05/2026 रोजी अंभई येथुन उडणगाव मार्गे पालोदकडे मोटार सायकलने जात असताना सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास आरोपीतांनी त्यांची मोटार सायकल ही फिर्यादी यांचे मोटार सायकलला अडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांचे ताब्यातील सोने, चांदी व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले वगैरे मजकुराचे फिर्यादवरुन पोस्टे अजिंठा गुरन 118/2026 कलम 309(6) बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहुन मा.पोलीस अधिक्षक श्री.प्रकाश भा.जाधव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी नमुद गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे तसेच गुन्ह्यातील आरोपी यांना तात्काळ अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.विजयसिंग राजपुत यांना दिल्या. त्यावरुन पो.नि. स्था.ग.शा.यांनी स पो नि पवन इंगळे,पोलीस अंमलदार विष्णु गायकवाड,शिवानंद बनगे, अशोक वाघ,अनिल काळे,महेश बिरुटे यांचे पथक तयार करुन पथकासह तात्काळ घटनास्थळी जाऊन नमुद घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटणास्थळाजवळ संशयीतरीत्या मो.सा.मिळाली होती सदर मो.सा. व संशयीत ईसम यांची ओळख पटविण्याकरीता गोपणीय बातमीदार नेमले, तसेच आजुबाजुचे रोडवरील, हाँटेल, खाजगी दुकाने,येथील सी.सी.टि.व्ही चेक केले, या दरम्यान संशयीत 30 ते 35 ईसम यांची चौकशी केली चौकशीअंती व गोपणीय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीवरुन घटनास्थळी आरोपीतांची सापडलेली मोटार सायकल ही दत्ता सुनिल राऊत रा.मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर हा वापरत असल्याचे समजले व त्यानेच सदरचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. की संशयीत दत्ता सुनिल राऊत.गेट नंबर 56 मुंकुदवाडी हा बिडकीन ता पैठण हा बिडकीन येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याठिकाणी सापळा लावुन त्यास नविन टोलनाका बिडकीन येथुन ताब्यात घेतले. त्याला विचारपुस केली असता त्याने गुन्हाची केल्याची कबुली दिली. तसेच ईतर साथीदार नामे रोशन ऊर्फ सोनु कैलास सुरडकर रा.बिडकीन व लखन शालीग्राम सूर्यवंशी वय-25 वर्ष रा.जनुना ता.जि.बुलढाणा याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन रोशन सुरडकर व लखन शालीग्राम सूर्यवंशी यांचा शोध घेतला असता ते दत्ता राऊत यास बिडकीन येथे सोनाराचा लुटलेला मुददेमाल वाटुन घेण्यासाठी येथे येत आहे.
अशा माहीती दिल्यावर त्याठिकाणी पोलीसांनी सापळा लावुन थांबलेले असता त्याठिकाणी दोघे येताच त्यांना ताब्यात घेत असतांना रोशन ऊर्फ सोनु सुरडकर रा.बिडकीन याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या कमरेला एक गावठी कटटा मिळुन आला, त्यादोघांना गुन्हाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, अंभई येथील सोनार हा घटनेच्या दिवशी सांयकाळी आपल्या सराफा दुकान बंद करुन जात असतांना अभंई येथील घाटात अडवुन त्याला मारहाण व चाकुने जखमी करुन त्याचेजवळील सोन्या चांदीची बँग ही हिसकावुन घेवुन तेथुन पळुन गेलो. वगैरे मजकुराची हकीगत सांगीतली. त्यांना सोनाराकडुन लुटलेला गुन्हातील मुददेमालाबाबत विचारपुस केली असता सोनाराचा लुटलेला मुददेमाल हा रोशन ऊर्फ सोनु सुरडकर याचे घरी ठेवलेला आहे असे सांगितले त्यावरुन सोनु सुरडकर भाडयाने राहत असलेल्या घरी जावुन घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये सोने,चांदीचे दागीने व रोख रक्कम, मोबाईल, व सोबत बाळगलेली गावठी पिस्टल असा एकुण-6,69600/-मुदेमाल जप्त करण्यात आला. नमुद इसम हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापुर्वी मालमत्तेविरुध्द व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती खालीलप्रमाणे
01) इसम नामे दत्ता सुनिल राऊत याचेवर दाखल गुन्ह्याची माहिती
01)बुलढाणा शहर गुरन 220/2025 कलम 310(4), 310(5) बी एन एस सह कलम 3/25 भा.ह.का
02) छ.संभाजीनगर ग्रा चिकलठाणा 03/2026 कलम 303(2) बी एन एस
03) छ.संभाजीनगर (श) मुकुंदवाडी 377/2025 कलम 3/25 भा.ह.का
02) इसम नामे रोशन ऊर्फ सोनु कैलास सुरडकर याचेवर दाखल गुन्ह्यांची माहिती
01 पारध जालना 257/2023 कलम 302,307,294,143,147,149 भादवि
02 पारध जालना 100/2023 कलम 324,452,143,147,148,149 भादवि
03)लखन शालीग्राम सुर्यवंशी याचेवर दाखल गुन्ह्यांची माहिती
बुलढाणा शहर गुरन 220/2025 कलम 310(4), 310(5) बी एन एस सह कलम 3/25 भा.ह.का
तरी नमुद इसम नामे 01)दत्ता सुनिल राऊत वय 26 वर्ष रा.मुकुंदनगर 56 नंबर गेट मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर, 02)लखन शालीग्राम सुर्यवंशी वय 23 वर्ष रा.जुनना ता.जि.बुलढाणा, 03)रोशन ऊर्फ सोनु कैलास सुरडकर रा.वालसांवगी ता.भोकरदन जि.जालना ह.मु.बिडकीन ता.पैठण यांना पुढील तपास कामी पोलीस ठाणे अजिंठा येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस ठाणे अजिंठा करीत आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.प्रकाश जाधव, अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग सिल्लोड श्री दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.विजयसिंग राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक श्री.पवन इंगळे, सुधीर मोटे, संतोष मिसळे, पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे, विष्णु गायकवाड, सचिन सोनार, शिवानंद बनगे, अशोक वाघ,अनिल काळे, महेश बिरुटे, आनंद घाटेश्वर, योगेश तरमळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, योगेश कुडे महीला पोलीस अंमलदार जनाबाई चव्हाण पोस्टे अजिंठा सपोनि अमोल ढाकणे, पोउपनि इंगळे यांनी केली आहे.








