माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे दिले निवेदन
भारज प्रतिनिधी राजेश दामधर
आपल्या देशात सर्व सामान्य माणसाला प्रशासकीय माहिती मिळावी म्हणून दि . 28 सप्टेबर 2005 रोजी माहिती अधिकार हा कायदा लागू करण्यात आला म्हणून प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात हा माहिती अधिकार दिन साजरा करावा असे निवेदन माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती तर्फे महाराष्ट्र भर निवेदने देण्यात आली त्या अनुषंगाने माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र जाफ्राबाद जि. जालना यांच्या तर्फे पोलीस ठाणे , पंचायत समिती , तहसिल कार्यालय , नगर पंचायत , ग्रामपंचायत यांना निवेदने देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक म्हस्के , तालूकाध्यक्ष राजेश दामधर , उपाध्यक्ष रामभाऊ ससाने , सचिव ज्ञानेश्वर निकाळाजे , संपर्क प्रमुख गजानन फलफले, सरपंच पुत्र शरद तेलंग्रे , ग्रामविकास अधिकारी चाँदखाँ पठाण , सदस्य अनिल ससाने , विजय देशमुख , ज्ञानेश्वर कडाळे , दिनकर जंजाळ , गणेश खंदाडे , संजय शिंदे , सिद्धार्थ गायकवाड, दत्ता सुरडकर , मधूकर बेराड , रमेश निकाळजे , दत्तु देशमुख , समाधान डब्बे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.








