अहिल्यानगर मध्ये 4 सख्ख्या बहिणींवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार, लग्न झालेल्या तरूणीलाही सोडलं नाही… पती-पत्नीवर राहुरी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल..!!
प्रियांका देशमुख अहिल्यानगर जिल्हाप्रतिनिधी.
आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाकांकडे सोपविण्यात आली होती. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यांतील दवणगांवत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी बजरंग साळुंखे याने आपल्याच कुटुंबातील चार बहिणींवर लैंगिक अत्याचार केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी बहिणींवर लैंगिक अत्याचार करीत होता. विशेष म्हणजे हा नराधम त्यांच्या लांबच्या नात्यातून नातेवाईक असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत. आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार बहिणींचा संभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आली होती. मात्र मुलींचे रक्षण करण्याऐवजी हा नराधम त्यांच्यावरच भक्षक बनला. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी आरोपींसह त्याच्या पत्नीलाही अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या पुढील कारवाईसाठी माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या देखरेखीखाली असलेल्या अल्पवयीन मुलींवर एका नातेवाईकांनेच वारंवार अत्याचार करणे हे संतापजनक जनक बाब असल्याचे सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी दांपत्याला अटक करून या गंभीर गुन्ह्याला जबाबदारांना कुठून शिक्षा व्हावी अशी आता मागणी होत आहे. आरोपी बजरंग साळुंखे हा फक्त अत्यचारी नव्हे, तर तो खुनी देखील आहे. सहा महिन्यांपूर्वी आरोपी बजरंग यांनी त्याच्या मेहुणा निलेश सारंगधर याचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर झाली आहे.








