आषाढी एकादशी
फलक रेखाटन
निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून त्यांनी अहोरात्र, प्रत्येक सण, असो वा उत्सव अशा प्रत्येक समयी आपली जबाबदारी चोख पणे पार पडणाऱ्या पोलिस बांधवानविषयी अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पोलिसांसाठी लाडक्या विठुरायाची वारी ही केवळ बंदोबस्तासाठी नसून पांडुरंगाची सेवा असते
असा सुंदर पोलिसांविषयीचा आदर आणि कृतज्ञ भाव या फलक लेखनातून शैलेश कुलकर्णी यांनी अचूकपणे मांडला आहे .शाळेच्या फलकाचा वापर हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यांतून विद्यार्थ्यांत सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण , तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलक लेखन करत असतात. सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा ह्यांचे सामाजिक फलक लेखन समाजात तसेच पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनत आहेत.
संकल्पना. आदरणीय संचालिका वैशाली ताई सूर्यवंशी
प्राचार्य – गणेश राजपूत सर
फलक रेखाटन
कला शिक्षक – शैलेश कुलकर्णी पाचोरा
