अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लांडेवाडी शाळेचे कौतुकास्पद यश
पियुष संतोष लांडे याची मंथन राज्यस्तरीय परीक्षेत भरघोस कामगिरी
मुख्य संपादक संतोष लांडे
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२४-२५ मध्ये लांडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी पियुष संतोष लांडे याने शाळेच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरावर आठवा आणि जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पियुषसोबत त्याचे वर्गशिक्षक मोनिका वाडेकर मॅडम आणि पालक संतोष व अनिता लांडे यांचा शाळा आणि गावकऱ्यांच्या वतीने गौरव करण्यात आला.
परीक्षेतील या उत्तुंग यशाबद्दल पियुष व त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेतील शिक्षक, मित्रमंडळी तसेच लांडेवाडी गावातील ग्रामस्थ व नातेवाईक यांनी पियुषच्या यशाचे भरभरून कौतुक केले आहे. शाळेच्या शिक्षण पद्धतीबाबतही सकारात्मक चर्चा रंगली आहे.
या यशाबद्दल पियुष लांडे, मोनिका वाडेकर मॅडम, संतोष लांडे व अनिता लांडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत
