भाग्यश्री विसपुते यांनी धुळे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची छत्रपती संभाजीनगर ला बदली
धुळे जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार
संभाजी पुरी गोसावी (धुळे जिल्हा) प्रतिनिधी.
राज्यांतील मागील काही दिवसांपूर्वी 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यामध्ये धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली होती, तर त्यांच्या रिक्त जागेवर भाग्यश्री विसपुते जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, सोमवारी दुपारी नवनियुक्त भाग्यश्री विसपुते यांनी मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून धुळे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, यावेळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला, याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील उपविभागीय अधिकारी (धुळे) रोहन कुवर भूसंपादक अधिकारी सीमा अहिरे बालाजी क्षीरसागर चंद्रशेखर देशमुख संजय बागडे तहसीलदार (धुळे ) अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, यावेळी नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून संवाद साधला, धुळे जिल्ह्याच्या नूतन भाग्यश्री विसपुते या धुळे जिल्ह्यात प्रथमच महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत,
