परतूर येथील सर्वे. नं. 145 च्या 7/12 उतारा बनावट तयार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
=======================
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी दिलीप माणिकचंद नहार यांनी दिलेल्या 156 (3) अर्जावरुन सन 2017 मध्ये रावसाहेब भापकर व खिराजी भापकर यांचेवर सेतू चालक गजानन माने यांच्या मदतीने 7/12 खोटा बनवून क्षेत्रफळात फेरफार केला असा आरोप करुन गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण खटल्याची संपरीक्षा झाल्याने रावसाहेब खिराजी भापकर यांची निर्दोष मुक्तता केली, तर खिराजी भापकर हे मयत झाल्याने त्यांच्या विरुध्द खटला रद्द करण्यात आला अभीयोग पक्षाकडून एकूण 06 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तत्कालीन तलाठी मुकुंद कुलकर्णी व तहसिलदार विनोद गुंडमवार यांना तपासण्यात आले परंतु गुन्हा सिध्द न झाल्याने प्रकरणात दिनांक 23/05/2025 रोजी मुक्त करण्यात आले .
परतूर येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, श्री. एल. डी. कोरडे साहेब यांनी रावसाहेब खिराजी भापकर यांची भा.दं. वि. कलम ४२०, ४६७, ४७१, ४७२, ३४ मध्ये निर्दोष मुक्तता केली असून आरोपीच्या वतीने अॅड. एन. एम. मस्के, परतूर यांनी काम पाहिले आहे
