एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला

पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला

कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार !

रणजित मस्के ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

पुणे ग्रामीण विभागांतील उरुळीकांचन पोलीस ठाण्याला नव्याने महिला प्रभारी अधिकाऱ्याची इंट्री उरुळी कांचनकरांना दिसून आली आहे. अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांची आज रोजी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशात नियुक्ती झाली आहे. तेथील पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता तसेच अवैध धंदे देखील चांगलेच जोमात चालू होते. त्यातच विषारी दारू प्रकरणामुळे उचलबांगडीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन वांगडे यांना सध्या कंट्रोल कडे रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याकडे उरुळीकांचन पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी पदभार घेताच माझ्याकडून इथे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहील,तसेच अवैध धंदे वाल्यांची गय केली जाणार नाही, विषारी दारूचे जाळे आणि गुन्हेगारी मोडीत काढणार असे स्पष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे पवार यांच्या नव्या एन्ट्रीमुळे आता उरूळीकांचन पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link