अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
केमिकल कारखान्यात सापडलं कोकिन नावाचा अमली पदार्थ.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व तळबीड पोलीस ठाणे जि. सातारा यांनी संयुक्तपणे छापा कारवाई करुन अंमली पदार्थ कोकेन केले जप्त
संपादकीय
कराड :मौजे तासवडे ता. कराड गावचे हददीतील तासवडे एम. आय. डी. सी. परिसरातील केमीकल कारखान्यावर कारवाई करुन ६,३५,००,०००/- रुपये किंमतीचा १.२७० कि. ग्रॅ. वजनाचे कोकेन जप्त
सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभाविपणे राबविण्या बाबत पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचित केलेले आहे. त्यानुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकूर यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिलेल्या आहेत.
सहा. पोलीस निरीक्षक श्री. किरण भोसले यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, तासवडे ता. कराड गावचे हददीतील तासवडे एम. आय. डी. सी. मधील सुर्यप्रभा फॉर्माकम या कंपनी मध्ये अंमली पदार्थाची साठवणूक व निर्मीती होत आहे. श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आदेशान्वये सपोनि किरण भोसले यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड व तळबीड पोलीस ठाणेचे संयुक्त पथकाने छापा कारवाई करुन कंपनीत एकुण १.२७० कि. ग्रॅ. वजनाचे ६,३५,००,०००/- रुपये किंमतीचा कोकेन हा अंमली पदार्थ फॉरेन्सिक सपोर्ट टिमचे मदतीने ताब्यात घेवून जप्त करण्यात आलेला आहे. सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे यांनी सरकार तर्फे तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये कंपनी मधील तीन इसम नाव (१) समीर सुधाकर पडवळ, रा. मलकापूर ता. कराड (केमीस्ट) (२) रमेश शंकर पाटील, रा. मल्हारपेठ ता. पाटण (३) जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवर्ड ता. पाटण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इतर आरोपी नाव (४) अमरसिंह जयवंत देशमुख, रा. नांदगाव ता. जि. सातारा (कंपनीचा मालक) एन.डी.पी.एस. गुन्हयामध्ये तेलंगणा पोलीस यांचे कोठडीत आहे. (५) विश्वनाथ शिपनकर रा. दौंड जि. पुणे याचा शोध सुरु आहे. गुन्हयाची व्याप्ती गांर्भीय लक्षात घेता विशेष तपास पथक गठीत करणेत आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, यांचे मार्गदर्शना खाली श्री. अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, स. पो. नि. किरण भोसले, अमीत बाबर, पोलीस उप निरीक्षक साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, ग्रेड पोउनि श्री. काळे, स. फौ. शशिकांत खराडे, पोलीस हवालदार शहाजी पाटील, योगेश भोसले, आंनदा रजपूत, गोरखनाथ सांळुखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभुते, अभय मोरे, सुंशात कुंभार, महेश शिंदे, प्रविण गायकवाड, गणेश राठोड, ऋषिकेश वेल्हाळ महिला पोलीस अंमलदार विनया वाघमारे, रत्ना कुंभार, शितल मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील स. फौ. संतोष सपाटे, दिनेश घाडगे, पोलीस हवालदार असिफ जमादार, संताजी जाधव, प्रशात चव्हाण, प्रविण पवार, पोलीस नाईक सागर बर्गे, दिपक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, सुरज चिंचकर, अमोल फल्ले, राजाराम बाबर तसेच फॉरेन्सिक विभागाचे पोलीस हवालदार प्रशात ताटे, दिनानाथ जाधव तसेच इंटरशिप करणारे प्रशिक्षणार्थी शंभुराज सांळुखे व आदित्य लोंढे सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित कुंभार, प्रशात मोरे, ओकांर डुबल, सुशांत घाडगे यांनी केलेली आहे.
