अजित पवार गटातील नेत्याच्या सुनेची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या
वैष्णवी हगवणे यांनी संपविले जीवन
संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपविले आहे, ही घटना शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारासमोर आली या प्रकरणात बावधन पोलिसांनी आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही घटना मुळशीतील भुकूम गावात घडली आहे, हुंडाबळी आणि आत्महत्या प्रवृत्ती केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे पती शशांक हगवणे आणि मुलीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडून 15 तोळे सोने फोरचुनर गाडी चांदीची भांडी लग्नात घेण्यात आली तसेच सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करून देण्याचा बोलीवर लग्न करण्यात आले होते, हगवणे कुटुंबाकडून हुंड्यासाठी वैष्णवी चा छळ करण्यात येत होता, तसेच तिचा पती शशांक याने जमीन खरेदीसाठी वैष्णवीला तिच्या वडिलांकडे दोन कोटी रुपये मागण्यास सांगितले होते, पैसे न द्यायला तुझ्या काय बापाला भीक लागली आहे का? नाहीतर तुला हाकलून देईल असे शशांक म्हटले होते, याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितले होते, वैष्णवीच्या चारित्र्यांवर संशय घेवुन तिचा पती कायमच तिचा छळ करत होता.. ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवी गरोदर असताना हे बाळ माझे नाही दुसरे कोणाचे तरी असेल असे म्हणत शशांक आणि सासरच्या लोकांनी वैष्णवीला मारहाण देखील केली होती त्यानंतर माहेरी आल्यानंतर वैष्णवी ने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. असाही उल्लेख एफआयर मध्ये दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे, या घटनेची नोंद बावधन पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास बावधन पोलीस करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर सासरा आणि दीर फरार झाले आहेत, तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली असून पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, आयोगांच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे,
