अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सराईत आरोपीकडून यमाहा कंपनीची दुचाकी गाडी जप्त
भारती विद्यापीठ पोलिसांची दमदार कामगिरी
संपादकीय
पुणे – दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कात्रज चौकातील उसाचा रस विक्री दुकानासमोरील रस्त्यावर फिर्यादी अभिजीत शिवाजी घोरपडे (वय २०, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) यांनी यमाहा कंपनीची आर.एक्स. १०० (गाडी क्र. WNH2460) पार्क केली होती. मात्र, अज्ञात इसमाने ती दुचाकी चोरी केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. २१५/२०२५) दाखल करण्यात आला.
वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना गुन्हा सराईत आरोपी मिथुन सुगंध लोखंडे (वय २२, रा. सहकारनगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरीस गेलेली यमाहा आरएक्स १०० दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांचा समावेश होता.
