गणेश शेरला यांची पद्मशाली संघमच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी नियुक्ती,
प्रतिनिधी शंकर जोग
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पर्वती विधानसभाचे उपाध्यक्ष गणेश शेरला यांची पद्मशाली संघम महाराष्ट्र राज्याचे सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली, हे नियुक्तीपत्र सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी पद्मशाली संघमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भूपती कमटम, प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, अखिल भारतीय पद्मशाली संघमचे युवा अध्यक्ष विश्वनाथ संगा, ज्ञानेश्वर बोड्ड, बद्रीनाथ जन्नू, महेश काडगी, नरसिंग नराल आदि यावेळी उपस्थित होते,
नियुक्तीपत्र स्वीकारताना गणेश शेरला म्हणाले समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन व संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दौरा करून संघटना भक्कम बांधण्याचे प्रयत्न करीन,
समाजाचे अनेक प्रश्न पुढील काळात सोडवण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले
