अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
सौ. कलावती गवळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे लोकप्रिय सीईओ कीर्ती किरण पुजार यांची धाराशिव जिल्ह्यात प्रथम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, सौ. कलावती गवळी (धाराशिव जिल्हा) प्रतिनिधी. धाराशिव चे नवे जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली आहे. कीर्ती किरण पुजार हे 2017 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी ११५ वी रॅक मिळवली होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सलग तीन वर्ष उत्कृंष्ट सेवा दिली, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर बदली असुन . मागील आठ दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासीयांचे चांगलेच लक्ष लागून होते. अखेर मंगळवारी राज्य शासनाने कीर्ती किरण पुजार यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कीर्ती पुजार हे ऑगस्ट 2022 ला रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम काम केले असल्याने ते अल्पावधीतच लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यांनी बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण अधिकारी प्रयत्न केले होते. कीर्ती किरण पुजार यांचा सोलर प्रोजेक्ट आणि हाऊस बोट हे दोन ड्रीम प्रोजेक्ट नुकतेच मार्गी लागले आणि त्यातच त्यांच्या धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नतीने बदलीची ऑर्डर आली. यावेळी स्वतः त्यांनी रत्नागिरी जिल्हा हा कायम माझ्या आठवणीत राहणार तसेच सर्वांचेच उत्तम सहकार्य लाभले असल्याचेही प्रतिक्रिया दिल्या. लवकरच नव्याने धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
