रविवार दिनांक २३/०२/२०२५ रोजी ठाणे पनवेल या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील नियोजित रेल्वे मेगा ब्लॉक दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे वतीने पर्यायी रस्ते मार्गाने पर्यायी बस व्यवस्था
प्रतिनिधी दौलत सरवणकर
उद्या रविवारी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे पाच तास ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील ठाणे ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु सदर मार्गांवर पर्यायी बस व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे नेहमी प्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे वतीने सदर नियोजित रेल्वे मेगा ब्लॉक दरम्यान nmmt प्रशासनास जादा बसेस सोडण्याची विनंती करण्यात येणार आहे. कारण nmmt प्रशासन नेहमी जादा बसेस सोडून रेल्वे ब्लॉक दरम्यान प्रवाश्यांना दिलासा देत असते. परंतु सदर nmmt बसेस कमी पडतात. त्या करिता आज रोजी दुपारी अकरा वाजता चे दरम्यान राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस टी) खोपट कार्यालय व ठाणे परिवहन सेवा (tmt) यांचे वागळे आगार कार्यालय येथे पत्र देऊन जादा बसेस सोडण्याची विनंती केली जाणार आहे. आज चौथा शनिवार असल्याने सदर दोन्ही कार्यालये नागरिकांसाठी बंद असण्याची शक्यता आहे.
सदर रेल्वे मेगा ब्लॉक दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत प्रवाश्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी छ. शिवाजी महाराज चौक कळवा येथील बेलापूर मार्गावरील सातारा बँक बस स्टॉप वर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे कळवा शहरातील शिवसेना, महीला आघाडी, युवा सेना, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे ही विनंती.
धन्यवाद. जय हिंद! जय महाराष्ट्र!!
विजय देसाई उपजिल्हाप्रमुख कल्याण लोकसभा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, ठाणे जिल्हा प्रतिनिधी :- श्री. दौलत सरवणकर.
