एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

उमरगा-लोहारा मतदारसंघासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

उमरगा-लोहारा मतदारसंघासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब मौलाली नदाफ

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतातील ओलावा संपुष्टात आला असून सोयाबीन, मुग, उडीद तसेच इतर खरीप पिके करपून वाळू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके पूर्णतः जळून गेल्याचे चित्र दिसत असून शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप पेरणी केली होती. मात्र पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे वाळत चालली आहेत, तर मुग व उडीद पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादनाची आशा मावळल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे अचूक पंचनामे करून शासनाकडे तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत, पीकविमा दाव्यांचे तात्काळ वितरण, कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ, वीजबिलात सवलत आणि इतर आवश्यक दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता उमरगा-लोहारा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाडा ‘�

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link