एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

छ. संभाजीनगर ग्रा पोलीसांची कामगिरी.

कारचालकास लुटमार करुन दरोडा टाकणाऱ्या ईसमांना स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनग ग्रामीण यांनी केले जेरबंद छ. संभाजीनगर ग्रा पोलीसांची कामगिरी.

प्रतिनिधी रणजीत मस्के

दिनांक ०९/०४/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पदमा हॉटेल ते शिवदत्त पेट्रोलपंपाच्या दरम्यान गोठयाजवळ देवळाई चौकाकडुन दोन मोटार सायलवर सहा ईसम येवुन फिर्यादी सुदामराव आबासाहेब शिंदे वय ६७ वर्ष रा. हातडी ता. घनसांवगी जि. जालना ह.मु गुरुप्रसाद नगर बीडबायपास छत्रपती संभाजीनगर यांना रिव्हाल्वरचा धाक दाखवुन त्याचे गळयातील पाच तोळे सोन्याची चैन हिसकावुन घेवुन पळुन गेले वैगेरे मजकुराचे फिर्यादीवरुन दिनांक १०/०४/२०२६ रोजी पोस्टे चिकलठाणा गुरन १७८/२६ कलम ३१० (२) बी एन एस प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल झालेला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सदर गुन्हयाची गंभीर दखल घेवून अशा प्रकारच्या दरोडयाच्या गुन्हयाचा तात्काळ छडा लावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक स्था.गु.शा विजयसिंग राजपुत, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना देण्यात आल्या. पो.नि स्था.गु.शा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा घडल्यापासुन तपास सुरु होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय माहितीवरुन संशयीत इसतांचे नाव, पत्ता तपासादरम्यान प्राप्त झाला होता. दिनांक १५/०४/२०२६ रोजी सपोनि पवन इंगळे सोबत, पोह ९४० गायकवाड, पोह १४१५ बनगे, पोह ३७३ वाघ, पोकॉ १५४७ बिरुटे, चालक पोकों १५२७ तांदळे असे पथकासह असे बीडबायपास, स्वराजनगर मुकुंवाडी भागात गुन्हयातील संशयीत ईसमांचा शोधघेत असतांना बाळापुर फाटा बीडबायपास येथे ईसम नामे १) रोहित रविंद्र काळे हा मोसासह थांबलेला आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यावरुन बीडबायपास बाळापुर फाटा येथे तात्काळ स्थागुशा पथक जावुन रोहित काळे यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास गुन्हया संदर्भाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नामे २) सुरज रविंद्र काळे, ३) ऋषिकेश गणेश उदावंत, ४) एक फरार आरोपी व दोन विसबा सर्व रा. स्वराजनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांचेसह केल्याची कबुली दिली. त्यावरुन गुन्हयातील ईतर आरोपी यांचा शोध घेतला असता ते बीडबायपास व स्वराजनगर परिसरात परिसरात मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना गुन्हया संदर्भाने विचारपुस केली असता त्यांनी घटणेच्या दिवशी बीडबायपास कारचालकास धाक दाखवुन लुटल्याची कबुली दिली. त्यांना गुन्हयातील गेला माल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सोनसाखळी विक्री करुन त्यातुन आलेले पैसे आपापसात वाटुन घेतल्याचे सांगितले. त्या पैकी रोहित काळे व सुरज काळे यांनी आलेल्या पैशातून बुलेट मोसा विकत घेतल्याची सांगितले तसेच सोनसाखळीमधील सोन्याचा एस नावाचा सोन्याचा पत्ता हा रोहित काळे याचे अंगझडतीत मिळुन आला. तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली यमाहा कंपणीची एफ झेड मोसा, ते वापरत असलेले मोबाईल फोन त्यांचे ताब्यातुन असा एकुण ४,२६०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयात १) रोहित रविंद्र काळे, २) सुरज रविंद्र काळे, ३) ऋषिकेश गणेश उदावंत, व दोन विसबा सर्व रा. स्वराजनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांना पुढील कार्यवाही कामी पोस्टे चिकलठाणा येथे हजर करण्यात आले आहे. नमुद गुन्हयात एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण श्रीमती पुजा नागरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवन इंगळे, सुधीर मोटे, पोलीस अंमलदार विष्णु गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, सचिन राठोड, सुनिल गोरे, महेश बिरुटे व चालक संजय तांदळे योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link