एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सोलापूर जिल्हा राष्ट्रीय जंगम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड; विविध पदांवर नवीन नियुक्त्या

सोलापूर जिल्हा राष्ट्रीय जंगम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड; विविध पदांवर नवीन नियुक्त्या

 

सोलापूर | प्रतिनिधी महालिंग स्वामी

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंगम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या सामाजिक कार्याला अधिक बळकटी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी संजय शिवय्या स्वामी तांदुळवाडी यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय जंगम संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण राजेंद्र जंगम (सातारा) होते. तसेच राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रशेखर स्वामी हुंडेकरी (लातूर), बसवराज स्वामी चिट्टे (लातूर) आणि सोलापूर येथील ज्येष्ठ जंगम समाजबांधव वैजनाथ स्वामी देवणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी चन्नया शरणय्या स्वामी, पंढरपूर विभाग कार्याध्यक्षपदी पप्पू स्वामी, तर सोलापूर जिल्हा समन्वयकपदी बसय्या मलय्या स्वामी (सांभाळशास्त्री) आणि संजय शिवय्या स्वामी यांची निवड करण्यात आली.
बैठकीस महिला अध्यक्षा सौ. नीता स्वामी यांच्यासह अश्विनी कळीमठ, धानम्मा मद्धली तसेच रविकांत स्वामी, श्रीशैल्य स्वामी (ग्रामसेवक), नागेश स्वामी, आप्पू स्वामी, महेश स्वामी, बसवराज मठपती, संकेत मसुती, संकेत विभूते, धानय्या स्वामी, लिंगय्या स्वामी, वीरभद्रया स्वामी, तम्मय्या स्वामी, वैभव स्वामी, महादेव स्वामी, सोमनाथ स्वामी, नितीश स्वामी, राचय्या स्वामी, बसय्या स्वामी, संतोष स्वामी आणि बसवराज स्वामी यांच्यासह जंगम समाजातील बांधव, माता-भगिनी, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण राजेंद्र जंगम (सातारा), राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रशेखर स्वामी हुंडेकरी (लातूर) आणि लातूर येथील ज्येष्ठ जंगम समाजबांधव बसवराज स्वामी चिट्टे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणणे, सामाजिक कार्याला चालना देणे आणि संघटनेचे कार्य जिल्ह्यात अधिक व्यापक करणे, या दृष्टीने या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link