मुरूममध्ये प्रतीक्षेत असलेल्या मतदारांची घोर निराशा! आ.चव्हाण बद्दल नाराजी
October 23, 2026
मुरूममध्ये प्रतीक्षेत असलेल्या मतदारांची घोर निराशा! 61.15 टक्के मतदान
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुरूम शहरात एकूण ६१.१५ टक्के मतदान झाले. शहरातील कन्या शाळेतील दोन्ही बूथवर मिळून ७४४ मतदारांपैकी ४५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून अनेक मतदार वेगवेगळ्या प्रतीक्षेत होते,मतदानाच्या पोलिंग चिटयाच जेवणावळीच्या निमंत्रण सांगणाऱ्या व्यक्तीकडे काम सोपवल्याने कुणाकडून काय अपेक्षा अशी स्थिती झाल्याने बऱ्याच मतदारात नाराजगी मात्र पाहता आलेमतदान अहवालानुसार, बूथ क्रमांक ६६८ वर ३७२ मतदारांपैकी २३५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २०७ पुरुष आणि २८ महिला मतदारांचा समावेश आहे.
बूथ क्रमांक ६६९ वरही एकूण ३७२ मतदार होते. त्यापैकी २२० मतदारांनी मतदान केले. यामध्ये १७८ पुरुष आणि ४२ महिला मतदारांचा समावेश आहे.
दोन्ही बूथची एकत्रित आकडेवारी पाहता, ३८५ पुरुष आणि ७० महिला अशा एकूण ४५५ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांचा सहभाग अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुरूम शहरात राजकीय हालचालींना वेग आला होता. गेल्या दोन दिवसांपासून अनेक पदवीधर मतदार विविध अपेक्षांनी प्रतीक्षेत होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांव्यतिरिक्त काही मतदारांपर्यंत जेवणावळींच्या निमंत्रणासाठी संपर्क साधणाऱ्या व्यक्तींमार्फत पोलिंग चिठ्ठ्या पोहोचविण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे कोणाकडून काय मिळणार, या अपेक्षेने थांबलेल्या काही मतदारांची घोर निराशा झाल्याची चर्चा शहरात रंगली.
आता मतदानानंतर उमेदवारांच्या समर्थकांकडून मतांच्या आकडेमोडीला सुरुवात झाली असून, मुरूममधील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याबद्दल मतदारात नाराजगी मात्र व्यक्त करण्यात येत होती ,निवडून आल्यानंतर ते कधी पदवीधर मतदारकडे फिरकले नाहीत अशी चर्चा होत होती त्यामुळे मुरूम मधील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने राहील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मतदान अहवालानुसार, बूथ क्रमांक ६६८ वर ३७२ मतदारांपैकी २३५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २०७ पुरुष आणि २८ महिला मतदारांचा समावेश आहे.
बूथ क्रमांक ६६९ वरही एकूण ३७२ मतदार होते. त्यापैकी २२० मतदारांनी मतदान केले. यामध्ये १७८ पुरुष आणि ४२ महिला मतदारांचा समावेश आहे.







