एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बेळंब ग्रामस्थांची महाराष्ट्र शासनाकडे जल स्वराज्य योजनेच्या चौकशीची मागणी

बेळंब ग्रामस्थांची महाराष्ट्र शासनाकडे जल स्वराज्य योजनेच्या चौकशीची मागणी

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ

उमरगा तालुक्यातील बेळंब गावात सन 2002 च्या सुमारास राबविण्यात आलेल्या जल स्वराज्य योजनेचे काम पूर्ण क्षमतेने झाले नसल्याने आज गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी शासनाकडून सुमारे 80 लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, काम अर्धवट राहिले, अनेक कामे पूर्ण झाली नाहीत आणि पाणीपुरवठा व्यवस्था अपेक्षित पद्धतीने कार्यान्वित झाली नाही. पाण्याच्या टाकीपर्यंतही नियमित पाणी पोहोचत नसल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. परिणामी, गावातील नागरिकांना आजही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

यामुळे बेळंब ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे की, जल स्वराज्य योजनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या योजनेत प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला, कोणती कामे पूर्ण झाली, कोणती अपूर्ण राहिली आणि निधीचा योग्य वापर झाला का, याची सखोल तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी.

तसेच, गावातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन जल स्वराज्य योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून बेळंब गावासाठी कायमस्वरूपी व शाश्वत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशीही ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाकडे कळकळीची मागणी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link