सामान्य ब्रह्मवृंदांचा महामंडळाचा उत्साह ओसरत चालला
गेली 3-4 दिवसात स्वयंघोषित नेत्यांच्या पोस्ट वाचून परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांना कशासाठी पाहिजे हे समजून यांच्या कार्याची खंत वाटते.
सर्वांचीच नजर फक्त अध्यक्ष होऊन मोठेपणाने मिरवणे. कमीत कमी उपाध्यक्ष तरी.
एकंदरीत बरेच स्वयंघोषित नेते महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे बाशिंग बांधून बसलेले आहेत. श्री दामले साहेब कधी जातात याची वाट पाहून आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील ब्रह्मवृंदांना या नेत्यांच्या कुरघोडीत व एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोप मध्ये महामंडळ कार्यान्वित होईल का? व गरजू ब्रह्मवृंदांना त्याचा फायदा होईल का? ही शंका आहे. अध्यक्ष पदाची माळ घालून फिरणार्या नेत्यांपेक्षा तिसरेच कोणीतरी निःस्वार्थी, निःष्प्रही महामंडळाचे अध्यक्ष व्हावेत असी अपेक्षा काही ब्रह्मवृंदांची असल्याचे दिसते. त्यात 1) श्री अतुल शास्त्री भगरेगुरूजी 2) श्री संत सुधीरदास, 3) खा.सौ. मेधा ताई कुलकर्णी 4) उद्योगपती डी.एस. कुलकर्णी. ही नावे प्राधान्याने समोर येत आहेत. आपले काही नेते फक्त कार व विमानाने चमचे सोबत घेऊन फिरतात . समाजाच्या सर्व सामन्यांच्या विचारात, चर्चेत नसतात. म्हणुन त्यांना वाटते मीच मोठा.
*परखड व कटू सत्य मत मी व्यक्त केल. पण राग येऊ देऊ नका. आत्मपरीक्षण केले तर येणार नाही.*
सखाराम कुलकर्णी.
नांदेड








